ढाणकी प्रतिनिधी - कोरोणाच्या पाश्र्वभुमीवर कोणीही घराबाहेर फिरू नये म्हणून पोलीस विभागा तर्फे वेगवेगळया क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. बिटरगांव पोलीस विभागाकडून ढाणकी उत्साही दुचाकी चालकांकडून वाहन चलान करून शासकीय महसूल वाढविण्याचे काम सुरू केले व त्यामूळे विनाकारण रस्त्यावरून फिरणा-यांचे प्रमाण सुध्दा मर्यादीत होण्यास मदत होत आहे.
ढाणकी येथील जुन्या बस स्थानकावर सर्व पोलीस कर्मचा-यांच्या समोरून वाहने नेल्या जातात. खरे तर या बिनकामाच्या अतीउत्साही तरूणांनी पोलीस कर्मचा-याच्या मागुन किंवा दुरून जाने अपेक्षीत आहे. सुशिक्षीत मंडळी तसे करतांना दिसुन येतात. मात्र काही अतिउत्साही 20 ते 30 वयोगटातील मुले नाहक रस्त्याने फिरतांना दिसुन येतात. ही बाब हेरून पोलीस विभागाकडून वाहन अडवून संबंधीताची योग्य ती चैकशी करून दंडाची पावती फाडून घेणे सुरू केले त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणा-यांची गर्दी कमी होईल असा कयास आहे.
बिटरगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण यांनी सर्व संबंधीतांना सुचना देवून विनाकारण फिरणा-यावर दंडात्मक कार्यवाही करण्याची मोहीम राबविली.
कोरोणाच्या महामारीमुळे ढाणकी परिसरात कोणताही रूग्न कोरोणा विषाणूमुळे बाधीत होवू नये म्हणूनच ही सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. विशिष्ट कालावधीत दुकाने, दवाखाने, दुग्धजन्य पदार्थाची दुकाने इ. जिवानावश्यक वस्तुचे दुकाने उघडे ठेवले जातात. मात्र कुठल्या न कुठल्या कारणाने नाहक फिरणा-यांची संख्या कमी होत नाही. अद्याप कोरोनाचे लोण ग्रामीन भागात आले नाही. कोरोणाच्या संदर्भात प्रत्येकाने काळजी घ्यावी. स्वतःचे व इतरांचे प्राणाचे रक्षण करावे असे पोलीस प्रशासनाकडून आव्हाण करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या