ढाणकी न्यूज नेटवर्क
ढाणकी वरून जवळच असलेल्या फुलसांवगी ता महागाव येथुन काल दि १६/४/२०२० राेजी रेतीचे टँक्टर निगंनुर मार्गे ढाणकी येथे येनार असल्याची टिप मिळाल्या नुसार
श्री स्वप्निल कापडनिस उपविभागीय अधिकारी साहेब उमरखेड, व श्री रुपेश खंडारे तहसिलदार साहेब उमरखेड, यांच्या मार्गदर्शनात
पथक प्रमुख श्री रामराव कुऱ्हाडे नायब तहसिलदार उमरखेड, श्री.राम पंडित मंडळ अधिकारी यांच्या पथकाने निगंनुरच्या जंगलात राञी अकरा पासुन दबा धरुन बसले.
सकाळी टक्टर च्या पुढे काही अंतर ठेवुन रस्त्यात पकडनारे काेनी नसल्याची खाञी करणाऱ्या माेटर सायकल वरील दाेन व्यक्तीनी पथकाची माहीती टँक्टर चालकास देवुन वाहन निगंनुरच्या पलीकडेच लपविन्यास सांगीतले.
पथकातील सदस्यानी परीसर पिंजुन काढत टायरच्या खुनावरुन मार्ग काढत याच मार्गावरील एका विटभट्टीवर एकदम आतमध्ये नेऊन उभे केलेले टँक्टर जप्त केले सदर टँक्टरचा चालक टँक्टर उभे करुन पसार झाला हाेता.
आज दि १७/४/२०२० राेजी सकाळी ४:३० वाजता विट भट्टीवर लपवुन ठेवलेले टँक्कर पकडले व
पथकातील कर्तव्यदक्ष कर्मचारी नितीन वाकुडे यांनी ट्रैक्टर डायरेक सुरु केले असता ट्रैक्टर चालक मोक्यावर आला व ट्रैक्टर तहसिल कार्यालय उमरखेड येथे पुढील दंडात्मक कार्यवाही करिता जमा केले आहे, यामुळे रेती तस्करांचे ढाबे दणानाले आहे.

1 टिप्पण्या
रेती घाट लिलाव करण्याची मागणी करा साहेब. नुसती लूट चालू आहे उमरखेड मध्ये
उत्तर द्याहटवा