ढाणकी प्रतिनिधी
ढाणकी पासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथे आज दि.15/03/2020 गावातील जातीय सलोखा कायम राहावा म्हणून पोलीस स्टेशन बिटरगाव व सावळेश्वर ग्रामस्थ यांचे संयुक्त विधमानाने भव्य रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्त दान शिबिरासाठी सावळेश्वर येथील ग्रामस्थ यांनी मोठया प्रमाणत सहभाग नोंदवून गावामध्ये जातीय सलोखा कायम राहावा म्हणून रक्त दान केले. रक्त दान शिबिरासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्याल नांदेड येथील टीम हजर होती. सदर रक्त दान शिबीर मध्ये 55 लोकांनी रक्तदान केले.सदर शिबिर यशसविरित्या पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशन बिटरगाव चे ठाणेदार विजय चव्हाण समस्त गावकरी मंडळीने सदर शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले.

1 टिप्पण्या
खूप छान दादा
उत्तर द्याहटवा