चिमुकल्यांनी केला सहा.अभियंत्याचा सत्कार. 40 वर्षा पासुन विद्युत तार काढण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा.


ढाणकी प्रतिनीधी-
ढाणकी गावाची हद्दवाढ व्हायच्या आधी त्या ठिकाणी शेती करीता असलेली लाईन 40 वर्षा  आधी प्लाॅटींग पडुन सुध्दा आहे त्याच स्थितीत होती शाळेनी व परिसरातील राहणा-या नागरीकांनी नेहमीच विद्युत वितरण कंपनीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या आपल्याला होणा-या लाईनच्या विद्युत तारेचे त्रास कथन करीत राहीले परंतु या कडे कोणीही आज पर्यंत 40 वर्षात लक्ष दिले नाही. म्हणुन सहा.अभियंता व कर्मचा-याचा सत्कार शाळे कडुन व नागरीकांच्या वतीने करण्यात आला.
नेहमीच आपल्या कार्यामुळे चर्चेत राहणा-या ढाणकी येथील विज वितरण कंपनी मधील सहा. अभियंता योगेश ठाकरे यांनी ज्ञानज्योती इंग्लीष मेडीयम स्कुल च्या वरून जाणा-या उच्च दाबाचे वायर हटवल्यामुळे लहान बालक तसेच पालकांनी सुटकेचा निष्वास सोडला आहे.त्या निमीत्त आज होळी सना च्या पाष्र्वभुमीवर त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजीत केला होता.
ढाणकी येथे नव्यानेच बदलुन आलेले सहा.अभियंता योगेष ठाकरे यांनी ढाणकी मध्ये येताच आपल्या कामामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतेच त्यांनी गावामधील एक निराधार महिला प्रमीला येलुरवार यांना स्वतः कोटेषेन भरून विज पुरवठा केला. गेल्या 30 वर्षापासुन ती महिला अंधारात आपले जिवन जगत होती. ठाकरेमुळे तीच्या जिवनात प्रकाष आला होता. त्याच प्रमाणे त्यांनी महिला दिनाचे आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन एकटीच व निराधार असल्यामुळे तीला येणारे दरमहा विज बिल सुध्दा स्वतः ती महिला हयात  असे पर्यंत भरणार असल्याचे सांगीतले त्यांमुळे त्यांचे गावात कौतुक होत आहे.
गेल्या अनेक वर्षा पासुन ज्ञानज्योती इंग्लीष मेडीयम स्कुल च्या वरून 11 केव्ही उच्च दाबाची वयार लाईन गेलेली होती. शाळेने वारंवार अर्ज देवुन ही त्यावर कोणतीही कारवाई न करता विज वितरण कंपनी ने लहान बालकांच्या जिवाषी खेळ चालु केला होता. मात्र सहा. अभियंता योगष ठाकरे यांनी उप कार्याकारी अभियंता वाघमारे, यांच्या मार्गदर्षनाखाली डिपी डिसी या योजने अंतर्गत सदर वायरींग काढुन नागरीकांच्या घरावरून व षाळेच्या पटांगणातुन गेलेली लाईन काढुन टाकल्यामुळे षाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विज वितरण कंपनीचे कर्मचारी अनिल सोळंके, चंद्रभान बाभळे, कृश्णा कत्तुलवाड, शेख इम्रान, नंदनवार, यासह गावातील नागरीक सुभाशबाबु कुचेरीया, शाळेचे मुख्याध्यापक संदीप कुंभारे व इतर कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या