बिटरगाव येथे कॉपी मुक्त अभियान यशस्वी



बिटरगांव प्रतिनिधी -कमलाकर दुलेवाड  
       माध्यमिक शालांत परिक्षा दिनांक 3 मार्च 2020 वार मंगळवार पासून सुरळीत सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी  मराठी या भाषा  विषयाची कृती पत्रीका अतिषय उत्साहात सोडविली आहे. येथील वसंतराव नाईक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर अतिशय शांततेत परीक्षा सुरु आहे. 
एकूण तीनशे पन्नास विध्यार्थी परीक्षेला बसले असून केंद्र संचालक जे.एम पाचकोरे यांचे विशेष लक्ष आहे. 
परिसरामध्ये कोठेही कसलाही अनुचीचीत प्रकार दिसला नसून विद्यार्थी अतिशय शांततेत परीक्षा सोडवत होते. 
शाळेतील शांतता पाहून कॉपीमुक्त अभियान यशस्वी झाल्याचे पालकांचे म्हणणे असून विद्यार्थ्यांना  शांततेत व भयमुक्त वातावरणात परिक्षा देता यावी म्हणून शिक्षण विभागाणे सर्वतोपरी तयारी केली आहे. त्या अनुशंगाने उमरखेड येथून परिरक्षक कार्यालयातून पेपर्स परीक्षा केंद्रात  पोहचवीण्यासाठी सहायक परिरक्षक नियूक्त करण्यात आलेले आहेत. तालूक्यातील अनेक शाळांवर माध्यमिक परिक्षा केंद्रे निष्चीत केले असून उमरखेड पोलीस स्टेशन  मध्ये अतिषय सुरक्षीत  कक्षामध्ये परीक्षेचे पेपर्स ठेवण्यात आले आहे व त्या ठिकाणाहून नियीमत पणे अभिरक्षक कार्यालयात आणून ते पेपर्स तालूक्यातील निष्चीत केलेल्या परीक्षा केंद्रावर वितरीत करण्यात येतात. त्यामुळे पेपर फुटण्याच्या प्रकाराला पूर्ण पणे आळा घातला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या