ढाणकी प्रतिनिधी
नव्याने च स्थापन झालेल्या नगर पंचायत पुढे अनेक समस्या आ वासून उभ्या राहत आहेत. स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य या सगळ्या समस्या तर आता नवीन नगर अध्यक्ष समोर आहेतच मात्र आता व्यापाऱ्या कडून सार्वजनिक स्वच्छतागृहाची मागणी होत आहे. तीस हजार लोकसंख्या असलेल्या ढाणकी शहारा मध्ये ऐक पण सार्वजनिक स्वच्छतागृह नसणे ही खूप मोठी शोकांतिका आहे. माणसांचे ठीक आहे मात्र स्रियांची मात्र मोठी कुचंबणा होत आहे. ढाणकी मध्ये नगरपंचायत चे कॉम्प्लेक्स आहे मात्र त्यात सुद्धा ऐक पण स्वच्छतागृह नाही आहे त्यामुळे व्यापारी बंधूना शासकीय गोदामाच्या भिंती चा आसरा घ्यावा लागत आहे.
ग्रामपंचायत असताना सुद्धा अनेक वेळा स्वच्छतागृहाची मागणी करण्यात आली होती मात्र त्यावेळी निर्माण झाली नाही. आता मात्र नगरपंचायत मागणी मान्य करेल का? असा व्यापारी तथा नागरिकांना प्रश्न पडला आहे.

1 टिप्पण्या
Yes 🆗 🚽👍
उत्तर द्याहटवा