शहरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने नवरात्रीच्या पावन मुहूर्तावर भैरव चंडी सेवा संपन्न झाली. Shri swami samarth seva kendra सेवा केंद्रातील भाविकांनी सहभाग नोंदविला. शिव आणि शक्ती यांची एकत्रित उपासना म्हणजे भैरव चंडी सेवा आहे. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" हे स्वामी समर्थ महाराजांचे अभय वचन ऐकून स्वामींचे भक्ताना नवी उमेद मिळते. जीवनात कितीही मोठे संकट आले तरी या महामंत्रामुळे आपोआपच संकटे दूर होतात. समस्त मानव जातीवरील संकटांचे निवारण व्हावे म्हणून नवरात्रीच्या पवित्र पर्वावर शिव शक्तीची उच्च कोटीची भैरव चंडी सेवा घेण्यात आली. शहरात प्रथमच अध्यात्मिक दृष्ट्या दुर्लभ अशी समजली जाणारी भैरव चंडी सेवा घेण्यात आली. अनुभवी गुरूच्या आशिर्वादाशिवाय अशी सेवा घडणे शक्य नाही अशी अध्यमतिक मान्यता आहे . सेवेकऱ्यांचे आध्यात्मिक गुरू म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. आपले गुरूंचे आशीर्वादानेच भैरव चंडी सारखी उच्च कोटीची सेवा घडल्याचे भावना सर्व सेवेकऱ्यांच्या तोंडून व्यक्त होताना दिसले. ही सेवा यशस्वी व निर्विघ्नपणे व्हावी म्हणून समस्त सेवेकऱ्यांचे वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करण्यात आली आणि ही सेवा निर्विघ्नपणे पार पडली . शिव शक्ती यांची उच्च कोटीची संयुक्तिक आराधना भैरव चंडी सेवा यशस्वी व्हावी म्हणून केंद्र निरीक्षक पूनम चव्हाण, केंद्र प्रतिनिधी योगिता चिन्नावार, निकिता रावते, शीतल फाळके, सविता गंजेवाड ,पुनम चव्हाण, माधवी हुडगे, अयोध्या महाजन,अभिजित कदम, गजानन रावते यांनी योग्य नियोजन केले होते. या वेळी सर्व सेवेकऱ्यांच्या वतीने समस्त सामूहिक प्रार्थना करण्यात आली.Shri swami samarth seva kendra

0 टिप्पण्या