ढाणकी आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मनसेची निवेदनाद्वारे मागणी. अन्यथा मनसे करणार आंदोलन.


ढाणकी प्रतिनिधी

ढाणकी शहराला जोडून असलेल्या खेड्यांची संख्या पाहता शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राला  ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळण्याची मागणी मनसेच्या वतीने निवेदनातून जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.

ढाणकी शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आले होते.  ढाणकी शहराची वाढती लोकसंख्या पाहून आज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय शासनाने करायला पाहिजे होते मात्र प्रशासन नागरिकांच्या यामागणी कडे दुर्लक्ष करत आहे.

 ढाणकी शहराची वाढती लोकसंख्या पाहून जर ग्रामपंचायतीची नगरपंचायत होऊ शकते तर नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे प्रशासन  लक्ष का देत नाही असा प्रश्न घेऊन मनसे तालुका अध्यक्ष शेख सादिक यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून ढाणकी आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय करण्याची मागणी केली.

रात्री अपरात्री शहरातील व ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या अपेक्षेने आरोग्य केंद्रात येतात मात्र आरोग्य केंद्रात कोणतीही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकारी  रुग्णाला आल्या पावली परत तालुक्याच्या ठिकाणी पुढील उपचारा करीता रेफर करत आहेत.

यामुळे ढाणकी येथील आरोग्य केंद्राची भली मोठी आवाढव्य  इमारत काय रुग्णाला रेफर करण्यासठी बांधून ठेवली का? आसा प्रश्न नागरिक लोकप्रतिनिधीला विचारत आहेत. 

तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रुग्णांच्या समस्या जाणून घेण्यासाठी  ढाणकी येथे आरोग्य केंद्राला भेट दिली होती त्यावेळी सुद्धा नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली होती  परंतु ती अद्याप पूर्ण झाली नाही.

 प्रशासन नागरिकांच्या या मागणीकडे वारंवार  दुर्लक्ष करत असल्याने  मनसे तालुका अध्यक्ष शेख सादिक यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर ढाणकी शहरात ग्रामीण रुग्णालय करण्यात यावे अन्यथा आरोग्य केंद्रासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष देवा भाऊ शिवरामवार, मनसे उपजिल्हा अध्यक्ष डेव्हिड शहाणे,  अभिजित नानवतकर सचिन येलग्नधेवार, हिरासिंग चव्हाण,  सिद्धार्त घुगरे,मुकुंद जोशी इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या