ढाणकी -शहरातील दोन नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असून त्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे भोवनार असल्याची चर्चा सध्या ढाणकी शहरात सुरू आहे.
ढाणकी नगरपंचायत झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 12 आणि 13 अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. या जागेवरून 2019 मध्ये प्रभाग क्रमांक 12 मधून मंदाकिनी नंदनवार तर प्रभाग क्रमांक 13 मधून रमेश पराते हे अनुसूचित जमाती साठी राखीव असलेल्या प्रभागातून निवडून आले. मात्र दोन वर्षानंतरही त्यांनी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली. पुन्हा 2021 मध्ये याच प्रभागात पोटनिवडणूक लागून प्रभाग क्रमांक 12 मधून दुर्गा साईनाथ मंतेवाड तर 13 मधून मोहिनी पंकज केशेवाड ह्या दोन उमेदवार निवडून आल्या. यांनाही निवडून येऊन एक वर्षाचा कालावधी लोटत आला असताना यांनी सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र अद्यापही सादर करू शकले नाही. त्यामुळे यांच्यावर सुद्धा अपात्रतेची कारवाई होते का? याकडे शहरातील नागरिकांची लक्ष लागून आहे. यासंदर्भात शहरातील एका नागरिकाने माननीय उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असून याबाबत चार आठवड्यात निकाल लागेल . मात्र या उमेदवारांच्या विरोधात निर्णय झाला तर ढाणकी शहराला पुन्हा एकदा पोट निवडणुकीला सामोरे जावे लागेल.
"वारंवार पोट निवडणुकीला सामोरे जाणे हे जनतेसाठी व शासनासाठी योग्य बाब नाही. निवडणूक प्रक्रियेवर होणारा खर्च हा अमाप असून पोटनिवडणुकीमुळे याचा अपव्यय होत आहे. तरी राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर करताना उमेदवाराकडे योग्य ती सर्व कागदपत्रे आहेत की नाही याची पडताळणी करूनच उमेदवारी द्यावी. जेणेकरून वारंवार अशा पोटनिवडणुकीला जनतेला सामोरे जावे लागणार नाही. व शासनाच्या पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होऊन तोच पैसा जन कल्याण योजनेसाठी कामी येईल."
.jpeg)
0 टिप्पण्या