मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना. शवविच्छेदन करण्यास ढाणकी आणि सोंनदाभी येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दिला नकार.



ढाणकी प्रतिनिधी -

बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अकोली गावातील अंकुश राठोड वय 34 वर्ष याने राहत्या घरी दिनांक 3 एप्रिल रोजी रात्री  राहत्या घरी  गळफास घेऊन आत्महत्त्या केली.

 अंकुश राठोड याने आत्महत्त्या केल्याची माहिती मिळताच बिटरगाव पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी घटना स्थळ गाठून  पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी   ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविण्यात आला. रात्र झाल्यामुळे शवविच्छेदन करण्यात आले नाही त्यामुळं रात्रभर मृतदेह ढाणकी आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला.

 सकाळीच दिनांक 4 एप्रिल रोजी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली, परंतु ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला त्यांच्या म्हणण्या नुसार ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गाव येत असेल त्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कडून शवविच्छेदन करून घ्यावे असे त्यांनी सांगितले .  मृताच्या नातेवाईकांनी व मित्र मंडळीने सोनदाभी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याकडे   मृतदेहावर शवविच्छेदन करण्याची मागणी केली परंतु सोनदाभी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यामुळे नातेवाईक काही काळ आक्रमक झाले होते. आणि मरणानंतरही  अंकुश च्या मृतदेह हा या प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्के खात होता.

आकोली गावातील नेते मंडळीने मृतदेहावर शवविच्छेदन करण्यासाठी आपापल्या नेत्यांना फोन केले तर काहींनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन केला मात्र ढाणकी व सोंनदाभी या दोन्ही आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  आपापली कार्यक्षेत्र नसल्याचे कारण देत शवविच्छेदन करण्यास नकार दिला.  त्यामुळे ढाणकी आरोग्य केंद्रासमोर जमलेल्या नातेवाईकांनी दोन्ही डॉक्टर वर कार्यवाही ची मागणी केली. अखेर थेरडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी ढाणकी ला येऊन माणुसकी धर्म पाळत आपले कार्यक्षेत्र गुंडाळून ठेवत मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

 

"अकोली गाव ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत  येत नसल्याने मृतदेहावर शवविच्छेदन केले नाही. पोलीस विभागांनी मृतदेह ढाणकी आरोग्य केंद्रात रात्री आणल्याने रात्र भर आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला होता त्यामुळे नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्याची मागणी केली. "

                      डॉ स्वाती मुनेश्वर 

                       वैद्यकीय अधिकारी 

              प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी 


"शवविच्छेदन करण्यास कोणतेही कार्यक्षेत्र नाही, मृतदेह ढाणकी आरोग्य केंद्रात असल्याने ढाणकी आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांनीच मृतदेह यावर शवविच्छेदन करायला पाहिजे होते."

                           डॉ डोंगे

             वैद्यकीय अधिकारी सोनदाभी 

     

भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असताना ग्रामीण भागात  शवविच्छेदनासाठी एवढी पायपीट करावी लागत असल्याने नागरिकांनी तीव्र संता व्यक्त केला. कर्तव्यात कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अकोलीवासी व परिसरातील नागरिक करत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या