वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे उपचारासाठी रात्रभर तडफडत राहिली निलगाय


ढाणकी प्रतिनिधी -

काल सायंकाळी अंदाजे साडे सहाच्या सुमारास बिटरगाव परिसरातील मोरचंडी रोड जवळील एका शेतात जखमी अवस्थेमध्ये नीलगाव आली असता शेतमालकाने ही बाब वनविभागाला कळविली. निलगाय ही रस्ता ओलांडताना पडल्याने तिच्या समोरली दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने तिला चालता येत नव्हते. काही वेळाने वन विभागाचे कर्मचारी सुद्धा शेतमालक सरकाळे यांच्या शेतात आले आणि नीलगायी ची अवस्था पहिली. जखमी नीलगायीला तातडीने यवतमाळ घेऊन जाणे गरजेचे असताना कर्मचाऱ्यांनी चपलता न दाखवता त्या जखमी नीलगायीला  तिथेच  थातूर मातुर उपचार करण्यात आले. घटना स्थळी स्वतः पशुधन विकास अधिकाऱ्यांनी हजर राहणे अपेक्षित असताना त्यांनी त्यांचा प्रतिनिधी तिथे पाठवला असल्याचे समजले. त्रास असह्य होत असल्या मुळे त्या निलगाय ची धडपड एखाद्या निष्ठुर माणसाच्या डोळ्याला सुद्धा पाझर फोडेल अशी होती.    पशुधन विकास अधिकाऱ्यांना विचारले असता जखमी प्राण्याला तातडीने यवतमाळ किंवा अमरावती न्यावे लागणार असल्याचे त्यांनी फोन वरून सांगितले.  जर वन कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी थोडीही कार्य तत्परता दाखवली असती तर त्या जखमी निलगाई ला तातडीने रात्रीच यवतमाळ नेता आले असते आणि उपचार सुरु झाले असते मात्र ते सकाळ होण्याची वाट पाहत बसले. त्यामुळे रात्र भर ती निलगाय वेदनेने आणि उपचारासाठी तडफडत होती. 

वन विभागाच्या या हलगर्जी पणा मुळे त्या बिचाऱ्या नीलगायी ला काय मरण यातना भोगाव्या लागल्या असतील तो विचार न केलेला बरा. वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने जर नीलगायीला काही झाले तर याची नैतिक जबाबदारी वन विभाग घेईल का? हा मोठा प्रश्न आहे.


"नीलगायी च्या उपचारासाठी  वनपरीक्षेत्र अधिकारी भोजने यांना दूरध्वनी वरून संपर्क केला असता ते सुद्धा अतिशय बेजाजबदार वक्तव्य करत असल्याचे जाणवले. विशेष म्हणजे साहेबांना त्या मुक्या प्रणाच्या जिवापेक्षा रविवार आणि झोप महत्वाची असल्याने निलगाय चा जिव धोक्यात आला."


"बिटरगाव येथे पशुधन विकास अधिकारी यांनी नेहमी हजर राहणे आवश्यक असताना अधिकारी हे ढाणकी वरून ये जा करत असल्याने जनावरांना वेळीच उपचार मिळने कठीण होत आहे. त्या मुळे बिटरगाव येथे त्यांनी मुख्यालयी राहणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते".

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या