पाण्याच्या टाक्यावर चढून नगरसेवकांचे शोले स्टाईल आंदोलन. न. प कार्यालयाला चपलांचा हार घालून व्यक्त केला निषेध.


 ढानकी प्रतिनिधी -

 ढाणकी नगरपंचायत ची रखडलेली विकास कामे निवेदन देऊनही सुरळीतपणे सुरू होत नाहीत. नगरपंचायत प्रशासन जनसामान्यांच्या कामासाठी आडकाठी धोरण अवलंबून नगरसेवकांची मुस्कटदाबी करत आहे. घरकुलाचा प्रश्नही अधांतरीच, असे अनेक जनसामान्यांचे प्रश्न  व  न प प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून नगरसेवकांनी आज नगरपंचायत कार्यालला चपलाचा हार घालून व पाण्याच्या टाक्यावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. भाजपाचे गटनेते संतोष पुरी, उमेश योगेवार, समर्थक साईनाथ मंतेवाड, पंकज केशवाड यांनी सहभाग घेतला.

"मागील तीन वर्षापासून ढाणकी शहरांमध्ये फक्त विकास काम होत असल्याचा आव आणल्या जात आहे. ढाणकीकरांच्या पाचवीला पूजलेला पाणी प्रश्न अद्यापही नगरपंचायत ला सोडवाण्यात यश आले नाही. घरकुलसाठी लागणारे कागदपत्रे सामान्य नागरिकांना नगरपंचायत कडुन मिळत नाही यामुळे आमची आणि जनतेची कुचंबना होत आहे. नगर पंचायत मध्ये नगरसेवकांचेच म्हणणे कोणी ऐकत नसून तेथे सामान्य माणसाला कश्या प्रकारे वागणूक दिली जात असेल याचा विचार न केलेला बरा. या सर्व बाबीला आता आम्ही कंटाळलो असून या हेकेखोर नगरपंचायत प्रशासनाविरुद्ध आम्ही हे आंदोलन करत असल्याचे नगरसेवक संतोष पुरी यांनी सांगितले."

जोपर्यंत रखडलेली विकास कामे सुरळीतपणे होणार नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या टाक्यावरून खाली उतरणार नाही असे धोरण आंदोलनकर्ते नगरसेवकांनी अवलंबिले होते. वृत्त लिहीपर्यंत  मुख्याधिकारी हे आंदोलन कर्ते यांच्या भेटीस आले नव्हते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या