अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी. गोविंदपूर येथील घटना.


ढाणकी  प्रतिनिधी -

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना ढाणकी पासून जवळच असलेल्या गोविंदपूर येथे घडली.
सविस्तर वृत्त असे की गोविंदपुर येथील शेतकरी अनिल दिगंबर चव्हाण वय ४५ वर्षे हे आपल्या शेतामध्ये २० जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतातील लाकडे गोळा करीत होता.  त्याचवेळी आधीच शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक अनिल चव्हाण वर हल्ला चढवला त्यात त्याच्या हाताला, खांद्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अस्वलाने हल्ला चढवताच शेतकऱ्याने आरडाओरड केली त्यानंतर शेजारीच असलेल्या लक्ष्मण रेणू राठोड या शेतकऱ्याने धाव घेत अनिल चव्हाण यांची अस्वलाच्या हल्ल्यातून सुटका केली.  त्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या अनिल चव्हाण यांना तातडीने ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. त्यानंतर त्यांची गंभीर अवस्था पाहून शेतकऱ्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या