महर्षी मार्कंडे जयंती उत्साहात साजरी.

      


ढाणकी प्रतिनिधी -

पद्ममशाली समाजाचे  आराध्य  दैवत श्री महर्षी  मार्कंडेय भगवान  जन्मोत्सव निमित्त  सर्व पद्ममशाली बांधवानी  मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ढाणकी नगरीतून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती. गावातील सर्व पद्मशाली समाज बांधव ,प्रतिष्ठित नागरिक, युवा वर्ग ,लहान चिमुकले व महिलांचा मोठा सहभाग शोभायात्रेत दिसून आला. टाळ मृदंगाच्या गजराने ढाणकी नगरी दुमदुमून गेली होती. गावातील भजनी मंडळांनी या  महर्षी मार्कंडेय यांच्या दिंडी मध्ये विशेष सहभाग घेऊन शोभा यात्रेची शोभा वाढवली.टाळ- मृदंगाचा गजर, रिक्षांवर विविधरंगी फुले आणि लाईटच्या माळांची सजावट, रस्त्यावर काढलेल्या रांगोळीच्या पायघड्यांवरून शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत मुख्य मार्गाने महर्षी मार्कंडे यांच्या प्रतिमेचा फोटो लावून अतिशय शांतपणे शोभायात्रा काढली गेली. व महश्री मार्कंडे चौक, मंदिर येथे ह.भ. प. बापूराव  महाराज आंदेगावकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या