पुणे : पुरंदर तालुक्यातील पुणे-पंढरपूर मार्गावर दोन मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोकुळ धोंडीबा झेंडे आणि पद्मनाभ झेंडे अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. गोकुळ झेंडे हे काल (दि.05) बुधवारी संध्याकाळी आपल्या नातवाला त्याची शाळा सुटल्यानंतर घरी घेऊ जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. यामध्ये गोकुळ झेंडे आणि पद्मनाभ झेंडे गंभीररित्या जखमी झाले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
.jpeg)
0 टिप्पण्या