आदर्श शिक्षिका माया कवानकर राज्यस्थरीय पुरस्काराने सन्मानित.


जालना प्रतिनिधी -

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणी उंचेगाव येथील कर्तव्यदक्ष शिक्षिका माया गंगाधर कवानकर यांना 100 शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थी प्रिय आणि कर्तव्यदक्ष अशी त्यांची ख्याती आहे. ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्या नेहमीच झटत आल्या असून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या  कलागुणांना  वाव देण्यात त्यांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 त्यांना मिळालेला सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची पावती असून यामुळे निश्चितच त्यांना गरीब व होतकरू मुलांसाठी कार्य करण्याचा हुरूप येईल असे यावेळी त्यांचे जावई चेतन मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या