ढाणकी प्रतिनिधी
ढाणकी पासून जवळच असलेल्या अकोली येथे एका युवकाने राहत्या घरात गळफास घेतल्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे. व्यवसायाने इंजिनीयर असलेल्या 25 वर्षीय वैभव दिगंबर कदम याने राहत्या घरी नाटीला दोरी लावून गळफास घेतला ही घटना 28 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी अंदाजे सात वाजता उघडकीस आली. घटनेच्या दिवशी मृतकाचे आई-वडील व अन्य कुटुंबीय जवळच्या एका नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेले होते. त्यामुळे वैभव घरी एकटाच होता. त्याने घराचे दार आतील कडी लावून बंद केले होते. घराशेजारी असलेल्या एका मित्राला सायंकाळचा डब्बा आणण्यास सांगून सायंकाळी पाचच्या दरम्यान आपली जिवनयात्रा संपवली. आवाज देऊन सुद्धा वैभव दार उघडत नसल्याने मित्राला संशय आला त्याने डोकावून पाहिले असता वैभवने गळफास घेतचे त्याच्या लक्षात आले. घटनेची माहिती अकोलीचे पोलीस पाटील श्धात्रक यांनी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांना दिली. घटनेचा पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे पाठवण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप कळालेली नाही.

0 टिप्पण्या