ढाणकी प्रतिनिधी
ढाणकी शहर पत्रकार संघ यांच्या वतीने 6 जानेवारी रोजी श्री.बाळकृष्ण जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व अभिवादन करून पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाने पत्रकार दिन साजरा करण्यात आला
शहरांमध्ये पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास घुगरे यांच्या अध्यक्षतेखाली ढाणकी ते खरुस खु. या रस्त्यावर काम करत असलेल्या मजुरांना फळ वाटप करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी ढाणकी शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी विनोद गायकवाड, स्वप्निल चिकाटे ,संजय भोसले, प्रशांत जोशी ,नागेश महाजन ,ब्रम्हानंद मुनेश्वर, उदय पुंडे, गजानन गंजेवाड, राहुल चौरे, मोहन कळमकर ,शेख फैयाज ,अनिल राठोड ,विकास चापके,प्रवीण जोशी, पंजाब कदम व सर्व शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या