ढाणकी प्रतिनिधी-
कोविड मुळे गेल्या दोन वर्षापासून ढाणकी शहरात सांस्कृतिक कार्यक्रम बंद होते. कोविड चे संकट दूर झाल्याने प्रशासनाने देखील निर्बंध दूर केले त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील नागरिकांना अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा याकरिता समस्त गावकरी मंडळी च्या वतीने नवरात्रीचे अवचित्य साधून " ढाणकी फेस्टिवल " या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी नागपूर येथील पी कुमार यांचा एवरग्रीन आर्केस्ट्रा संच बोलावण्यात आला होता. यावेळी संचातील कलाकारांनी सदाबहार गाणी, नृत्याविष्कार दाखवून ढाणकी करांना भुरळ घातली, अंदाजे तीन ते चार हजार नागरिक गुलाब सिंग ठाकूर शाळेच्या प्रांगणात या कार्यक्रमासाठी जमले होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शहराती तरुण व सध्या नागपूर येथे स्थायिक असलेल्या शेख सलीम याने निर्माण केलेल्या चित्रपटचा प्रोमो दाखवण्यात आला. विशेष म्हणजे या चित्रपटातील गाणी ढाणकी मधील दुसरा तरुण प्राध्यापक विनोद देविदास देवरकर यांनी लिहलेली आहेत. याच कार्यक्रमात शहरातील साक्षी संभाजी गोरटकर व मीना राजेश पुजलवाड या दोन चिमुकल्यानी आपली नृत्य कला सादर केल्याने प्रेक्षकांची त्यांनी चांगलीच दाद मिळवली.भव्य दिव्य अश्या या ऑर्केस्ट्रा ने ढाणकी करांच्या मनावर असलेली दोन वर्षा पासूनची मळभ निघून गेली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिटरगाव पोलीस स्टेशन च्या वतीने चोख बंदोबस्त होता.
ढाणकी फेस्टिवल या कार्यक्रमा च्या निमित्ताने शहरातील सर्व राजकीय पक्षाचे नेते एका मंचावर दिसले. गावाचा कार्यक्रम असल्याने राजकारण बाजूला ठेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळे झटत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


0 टिप्पण्या