ढाणकी प्रतिनिधी
या वर्षी सर्व भारतीय आपल्या आजादी चा अमृत महोत्सव मोठ्या हर्ष उल्हासात साजरे करत आहेत. स्वराज्य सप्ताहाचा एक भाग म्हणून दिनांक 17 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यामध्ये सकाळी ठिक अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगान गाण्याचा संकल्प केला शासनाने केला होता.
ढाणकी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिक अकरा वाजता शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थी, व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी राष्ट्रगीत गाऊन देशाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. पोलीस प्रशासनाने या कार्यक्रमाचे चोख नियोजन केले होते. पोलिसांच्या मदतीला शहरातील व्यापारी, पत्रकार, नगरपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी धावून आले व या बंदोबस्त कामांमध्ये स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले. शहरात जागोजागी राष्ट्रध्वज घेऊन विद्यार्थी उभी दिसत होती. शहरातील चारही मुख्य रस्त्यांवर विद्यार्थी व नागरिक राष्ट्रगान जाण्यासाठी सज्ज झाले होते . राष्ट्रगान झाल्यानंतर आकाशा मध्ये राष्ट्रध्वजाच्या रंगाचे फुगे सोडण्यात आले व भारत माता की जय या नाऱ्यांनी ढाणकीचे आसमंत दुमदुमले.
यावेळी सामूहिक राष्ट्रगान गाण्यासाठी अंदाजे सात हजार विद्यार्थीसह पंधरा हजार नागरिक हजर होते.
पोलीस प्रशासनाने घेतलेली मेहनत वाखाण्याजोगी होती.
विशेष म्हणजे यावेळी ढाणकी चा नागरिकांमध्ये कमालीची एकता दिसून आली.

0 टिप्पण्या