हिंगोली प्रतिनिधी-
पावसाळ्यामध्ये पाळीव जनावरांवर विविध प्रकारचे रोग व आजार पसरतात त्यामुळे काही जनावरे दगावतात व शेतकऱ्यांचे व मध्यमवर्गीय कुटुंबाचे मोठे नुकसान होते. या रोगराई पासून आपल्या पाळीव व दुभत्या जनावरांना वाचवण्यासाठी त्यांच्यावर योग्य उपचार व लसीकरण करणे गरजेचे असते. या अशा जनावरांवर कोणतेही रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी हिंगोली येथील धान फाउंडेशन व एचडीएफसी बँकेच्या संयुक्त विद्यमानाने जनावरांचे लसीकरण शिबीर घेण्यात आले .
या शिबिराचे आयोजन वायचाळ, पिंपरी व लासिना या गावामध्ये केले होते.
आकाशझेप कलंजियम महिला महासंघ हिंगोली मार्फत स्थापित बचत गटातील महिला व गावातील शेतकरी यांच्या शेळी,गाई म्हैस,बैल यांची डॉ राहुल वैद्य यांनी तपासणी करून योग्य ते उपचार केले व रोगराई पासून आपल्या जनावरांची कशी काळजी घ्यावी याबद्दल सल्ला दिला. नितिन खडके धान फाउंडेशन विभागीय अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी दवणे आ.कं.म.मा.व्यवस्थापक, व ज्योति कोरपडे सहयोगिनी, प्रियंका इंगळे सहयोगिनि, माधव वायचाळ, विनोद वाबळे, राहुल इंगोले, कापसे यांनी मोलाचे सहकार्य केले.

0 टिप्पण्या