ढाणकी प्रतिनिधी -
तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीमुळे जग जवळ आले, मात्र यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये सुद्धा वाढ झाली. फेसबुक, ट्विटर,व्हाट्सअप यासारख्या सामाजिक माध्यमातून नागरिकांना आणि खास करून युवकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.
सायबर गुन्ह्यातील एक प्रकार असलेला हनी ट्रॅप सध्या ग्रामीण भागात सुद्धा फोफावत असून युवकांनी या जाळ्या पासून दूर राहण्याचे आवाहन बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांनी केले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तरुणी युवकांची ओळख वाढवतात , ओळखीचे रूपांतर प्रेमात होते , आणि नंतर अश्लील हावभाव करून तरुणांशी व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून रेकॉर्डिंग करून त्यांना पैशाची मागणी होते . पैसे नाही दिले तर तो व्हि डीओ समाज माध्यमावर टाकण्याची धमकी दिली जाते यामुळे घाबरलेला पीडित व्यक्ती हा समोरच्या व्यक्तीला बदनामीच्या भीतीपोटी पैसे देतो आणि याची वाच्यताही कुठे करत नाही यामुळे ते असल्या गुन्ह्यांना वाव मिळत असल्याचे ठाणेदार प्रताप भोस यांनी बोलताना सांगितले.
ढाणकी परिसरात सुद्धा अशा या हनी ट्रॅपचे काही व्यक्ती शिकार झाली असून फक्त बदनामीच्या पोटी कोणीही रीतसर तक्रार देत नसल्याने या अशा गोरख धंदा करणाऱ्या व्यक्तींना वाव मिळत आहे. तरी समाज माध्यमांचा उपयोग करताना डोळे उघडे ठेवून उपयोग करायला हवा. जेणेकरून कोणी आपल्याला फसवू शकणार नाही.
फेसबुक, व्हाट्सअप यावरून कोणत्याही अनोळखी व्यक्तींना आपली खाजगी माहिती देऊ नका, कुणी आपली बँकेची माहिती विचारत असल्यास त्यांना ती देऊ नका, कुटुंबातले फोटो सोशल मीडियावर टाकू नका , कुणालाही आपल्या बँकेची ओटीपी शेअर करू नका आणि जबाबदारीने या माध्यमांचा वापर करावा जेणेकरून यासारख्या सायबर गुन्ह्यांना थोड्या प्रमाणात आळा बसेल. यासाठी तरुणांनी सजग राहण्याचे आवाहन ठाणेदार प्रताप भोस यांनी केले आहे.
.jpeg)
0 टिप्पण्या