सोईट शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू.



ढाणकी प्रतिनिधी 

 ढाणकी पासून जवळच असलेल्या सोईट म शिवारात एका बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

 सोईट  येथील देविदास माघाडे यांच्या शेताजवळील नाल्या मध्ये  सदर बिबट्या आढळला. गावातीलच एका शेळा चालणाऱ्या संदीप माघाडे या मुलाने नाल्यातुन दुर्गंधी येत असल्याने जाऊन पाहिले असता हा प्रकार लक्षात आला. त्याने गावातील नागरिकांना ही माहिती दिली. ही माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला कळविली. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप कळलेले नसून शवविच्छेदनानंतर माहिती कळेल असे वन विभागाकडून सांगण्यात आले.


सोईट  शिवारात बिबट्याचा बिबट्या आढळणे हे प्रथमच घडले असून सदर बिबट्या चा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध वनविभागाने लावणे गरजेचे आहे .

 -चेतन मोरे

 सामाजिक कार्यकर्ता सोईट म

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या