ढाणकी प्रतिनिधी : ढाणकी गावाचे शहर झाले आणि शहराचा विकास होणार अशी भाबडी आशा ढाणकी वासियांना लागली होती.
मात्र गटातटाच्या राजकारणात मध्ये शहराचा विकास पूर्णपणे खुंटला.
सत्तापिपासु धोरण आणि हेकेखोरी यामुळे विकासाला कमालीची खिळ बसली आहे. पाणी पुरवठा, पथदिवे, यात तांत्रिक अडचणी आणणाऱ्या गटाने घन कचरा व्यवस्थापनात देखील हेकेखोरी दाखवत कचरा कोंडी केल्याने शहरात एकमेव सुरु असलेले विकासकाम देखील बंद पडणार असल्याची चर्चा आहे.
ढाणकी शहराला शहर का म्हणावे हाच मोठा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. ढाणकीत नागरिकांना शहरी सुविधा कोणत्याही मिळत नाही, खांबावर लाईट नाही तर नळाला पाणी नाही, शहरात स्वच्छतागृह नाही, रस्ते मजबूत नाही, अशा एक ना अनेक समस्यांनी ढाणकी शहराला ग्रासलेली आहे. फक्त शहरात घनकचरा व्यवस्थापन एकच विकास काम चालू होते आणि तेही नपच्या सावळ्या गोंधळात बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
नव्याने झालेल्या ढाणकी नगर पंचायत क्षेत्रात नागरी सुविधांची वानवा आहे. थेट जनतेतुन भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत, तर कांग्रेस, वंचित राष्ट्रवादी समितिवर निवडल्या गेले. बहुमताचा आधार घेत अनेक विकासकामात शह- काटशहाचे राजकारण बोकाळले आहे. भरित भर पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने प्रभारावर काम सुरु आहे. घनकचऱ्याचे कंत्राट महिन्याभरात संपनार आहे. नव्या कंत्राटासाठी कंसलटेंट नेमन्यासाठी निविदा प्रक्रिया पार पडली, मात्र यात सत्ताधारी गटाला झुकते माप देणाऱ्या कंत्रादारांएवजी दुसऱ्याच कंत्राटदाराने कमी दराची निविदा भरली नियमप्रमाने पुसद येथील एक कंत्राटदार एल 1 झाला, ज्यामुळे बहुमत असलेल्यांची गोची झाली, मात्र काहीही झाले तरी कंत्राट आपल्याच माणसाला मिळावे म्हणून स्थायि समितीच्या सभेत वर्क ऑर्डर नाकारण्यात आल्याचा अफलातून प्रकार घडला आहे, आता कंसलटेंट नसल्याने वेळेत घनकचऱ्याची कामे होणार नाही परिणामी सत्तापीपासू राजकारण्यांच्या हेकेखोरपणाचा त्रास सामान्य ढाणकीकरांना होणार यात दुमत नाही.
जिल्हाधिकाऱ्यांकड़े तक्रार
बहुमताच्या जोरावर जनतेची कोंडी करण्याचा प्रकार निंदनीय असून या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल.दिली आहे.
.jpeg)
0 टिप्पण्या