फोन कराल तर काम सोडून देण्याची ठेकेदाराची धमकी. सोईट ढाणकी रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे


 ढाणकी प्रतिनिधी-

सध्या सुरू असलेल्या ढाणकी सोईट रस्त्याची मजबुतीकरण व पुनर्बांधणी चे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून त्यामध्ये खदानी चा दगड न वापरता हलक्या दर्जाचा विहिरीचा दगड वापरल्या जात आहे. तसेच हे काम अतिशय संथ गतीने होत असल्याने शेतकरी तसेच नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यांची गुणवत्ता व दर्जा बाबत अनेक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तोंडी व लेखी तक्रारी सुद्धा केल्या होत्या. तशाही परिस्थितीत संबंधित ठेकेदारांनी कोणालाही न जुमानता मनमानी चा कळस गाठत रस्त्याचे काम पूर्ण करत ढाणकी शहराच्या एक किमी अंतरावर आणून अर्धवट अवस्थेत ठेवल्यामुळे प्रवाशांसह शेतकऱ्यांना त्या रस्त्यावरून ये-जा करणे मोठे जिकरीचे बनले आहे. नागरिकांची वाढती ओरड बघून बांधकाम विभागाने काही दिवसापूर्वी त्या रस्त्याचे रुंदीकरण आच्या कामाला सुरुवात केली. मात्र संबंधित ठेकेदार या कामात कुचराई करत असून अतिशय निकृष्ट दर्जाचा हा रस्ता बनवत असल्याची नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे पहिल्याच पावसामध्ये हा रस्ता पाण्यासोबत वाहून जाईल असे सुद्धा नागरिकात बोलले जात आहे. यामुळे बांधकाम विभागाने या कामाकडे लक्ष देऊन गुणवत्तापूर्वक काम संबंधित ठेकेदाराकडून करून घेणे गरजेचे आहे.


 या रस्त्याच्या चौकशी संदर्भात ठेकेदार संतोष चव्हाण यांना फोन केला असता मला वारंवार फोन करू नका,  आणि कोणत्याही प्रकारची माहिती विचारायची असल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारा. यानंतर जर फोन कराल तर खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन काम बंद करून टाकेल, आणि माझा कोणीही मालक नाही अशा स्वरूपात धमकी दिल्याची सुद्धा नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा मुजोर ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ढाणकी परिसरातून होत आहे.


या रस्त्यावरून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा चालू असते. आता पेरणीचे दिवस सुद्धा जवळ आले असल्याने. या खराब रस्त्यामुळे बी-बियाणे तसेच खते नेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण होणार आहे. तरी संबंधित ठेकेदाराने काम नियमानुसार व मजबूत करणे गरजेचे असून त्यामुळेच भविष्यात हा रस्ता तग धरू शकेल.


 गजानन मिटकरे,

सामाजिक कार्यकर्ता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या