अल्पभुधारक तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.


ढाणकी प्रतिनिधी -

            दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या घराजवळील कोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली मृत्तक अविनाश प्रकाश मुडे या ( 4o ) वर्षिय अल्प भुधारक तरुण शेतकर्‍याने 14 मे रोजी सकाळी 4 वाजताचे सुमारास स्वतःच्या घराजवळील गोठ्यात आत्महत्या केली आहे . दोन एकर शेती असलेला अविनाश हा एक वर्षापासून कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होता . खाजगी दवाखान्यांमध्ये महागडे उपचार घेऊन त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईस आल्याने त्याने आत्महत्येचा पर्याय निवडला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे . मृत्तकाच्या पश्चात पत्नी एक मुलगा , मुलगी, आईवडील व भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे . घटनेची माहिती प्राप्त होताच बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गजानन खरात, पो. कॉ . दत्ता कुसराम यांनी घटनास्थळ पंचनामा करून प्रेत ढाणकी येथील शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या