उमरखेड प्रतिनिधी -
स्थानिक नगर परिषदेत उघडीस आलेल्या 65 लाखांच्या कचरा घोटाळ्यातील आरोपी असलेले माजी नगराध्यक्ष तथा महागाव उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेव ससाने यांच्यावर विविध कलमान्वये उमरखेड पोलिस स्टेशन येथे भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या हस्ते 1 मे रोजी होणारे ध्वजारोहण करणे म्हणजे संविधान तसेच ध्वजाचा अवमान आहे असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सय्यद माजीद यांनी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

0 टिप्पण्या