ढाणकी प्रतिनिधी -
देशातून पोलिओचे उच्चाटन होण्यासाठी चालविण्यात येणाऱ्या प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेला ढाणकीत उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून शून्य ते पाच वयाच्या वयोगटातील बालकांचे यावेळी लसीकरण करण्यात आले. शासनाच्या वतीने कोणतेही बालक हा या पोलिओच्या डोसा पासून सुटवा नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली. प्रत्येक ठिकाणी आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविका, व डॉक्टरांचा ताफा बालकांचे लसीकरण करण्यासाठी सज्ज होता. जुने बस स्टँड, बाळासाहेब ठाकरे चौक, इत्यादी ठिकाणी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स बालकांचे सकाळपासूनच लसीकरण करत होत्या. यामुळे शंभर टक्के बालकांचे लसीकरण होण्यासाठी हातभार लागला.
अशाप्रकारे पोलिओची ही मोहीम राबवण्यात येत असल्यामुळे आपल्या देशातून पोलिओचे उच्चाटन झाले असून याचे श्रेय आपल्या देशातील आशा वर्कर्स, नर्सेस, अंगणवाडी सेविका, व डॉक्टरांना दिल्यास वावगे ठरणार नाही.
0 टिप्पण्या