ढाणकी प्रतिनिधी
ढाणकी नगरपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला संपूर्ण बहुमत प्राप्त झाले नसल्याने काँग्रेस 6 राष्ट्रवादी 1,वंचित बहुजन आघाडी 2, अपक्ष 1,असे नगरसेवक मिळून एक गट निर्माण करण्यात येऊन गटनेता व उपाध्यक्ष पदी जहीर जमीनदार तर चारही विषय समित्या पदी चार नगरसेवकाला सभापती पदे देण्यात आले. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेस आघाडीला बाहेरून पाठिंबा देत सतेत सहभागी होण्याचा प्रयत्न केला मात्र शिवसेनेच्या दोन्ही नगरसेवकाचे स्वप्न घटकेचे ठरले. वेळेत जात प्रमाण पत्र दाखल न केल्याने त्यांना अपात्र घोषित करण्यात आल्याने नगरपंचायतीला पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागले. दोन्ही प्रभागात पोटनिवडणूक होऊन त्याठिकाणी भाजपा च्या नगरसेवकाला विजय मिळवला, त्यामुळे भाजपा चे नगरपंचायत संख्याबळ वाढून 6 झाले आहे.
ढाणकी नगरपंचायत ला एक वर्षांपासून विषय समित्या सभापती पदापासून वंचित असल्याने नगरपंचायत सर्वसाधारण सभेला विशेष महत्व आले या कारणाने आपल्या नगरसेवकाच्या वार्डातील समस्या सोडविण्या करीता नगरपंचायतच्या होणाऱ्या 27 जानेवारीच्या सर्वसाधारण सभेकरीता गट नेते जहीर जिमनदार यांनी विषय सूचीवरील ठेवण्यात आलेल्या विषयाच्या अनुसंघाने गटनेता घेतील त्याविषयाचे पालन करणे, सर्व नगरसेवकाला ( व्हिप) पक्ष आदेश काढून त्याची आमलबजावणी करण्याचा आदेश आपल्या गटा तील नगरसेवक ज्योती ओमाराव चंद्रे,रिजवाना शेख समीर, शंकर ताटिकुंडलवार, शायदाबी शेख मिरांजी,शेख इरफान शेख मस्तान,नूरजबेगम शेख हुसेन,सोनम नितीन बैस,संबोधी गायकवाड़,बसनूरबी सै खालील, यांना बजावण्यात आला. गट नेत्याने काढलेला व्हिप झुगारून विरोधकाला मदत केल्यास त्याच्यावर नियमा प्रमाणे महाराष्ट्र नगरपंचायत आधिनियमा प्रमाणे अपात्रतेची कारवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ढाणकी नगरपंचायत उपाध्यक्ष तथा गटनेते यांनी अचानक पणे व्हिप पक्षादेश का लागू केला?याविषयी शहरात वेगवेगळी चर्चा नागरिक करत आहेत.
0 टिप्पण्या