पत्रकार हाच समाजाचा खरा आधार असल्याने त्यांनी निर्भीड पत्रकारिता करण्याची गरज -ग्रा.प.सदस्य पंजाबराव कदम यांचे प्रतिपादन.

 


 महेश कामारकर हिवरा 

समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवुन देण्याचे कार्य पत्रकार करीत असल्याने समाजातील दिन दुबळ्या घटकांचा खरा आधार पत्रकारच असुन त्यांनी निर्भीड पणे समाजाच्या समस्या, वाईट कामांबद्दल लिखाण करून अशा निच प्रवृत्तीचे पितळ उघडे पाडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त ग्रा.प.सदस्य पंजाबराव कदम यांनी केले आहे.

मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधुन हिवरा ग्राम पंचायत चे नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्य पंजाबराव पाटील कदम यांनी हिवरा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला याप्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की, समाजातील शोषित ,पिडीत, दिन दुबळ्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लेखणीच्या माध्यमातुन आवाज उठवुन त्यांना न्याय मिळवुन देण्याचे कार्य पत्रकार करीत असल्याने त्यांचा समाजाला एकमेव आधार  वाटतो त्यामुळे पत्रकारांनी निर्भीडपणे समाजातील वाईट कामाबद्दल लिखाण करण्याची गरज आहे.

यावेळी राजेंद्र कदम,प्रकाश डांगे,हिवरा पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान फाळके,राजेंद्र गिरी,विनोद खोंडे,बिहारी जयस्वाल,सुनिल चव्हाण, महेश कामारकर, राम जाधव,संदीप कदम उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या