ढाणकी प्रतिनिधी -
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले असून बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या 14 गुन्हेगारांचा तडीपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्याकडे पाठवला असून त्याला अधीक्षकांकडे सुद्धा हिरवी झेंडी मिळाली आहे.
ढाणकी येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस, उपनिरीक्षक कपिल मस्के मस्के यांनी ही माहिती दिली. समाजात वावरत असताना कळत-नकळत रागाच्या भरात एखाद्या वेळी अपराध होऊ शकतो परंतु एखादा व्यक्ती कायद्याला न जुमानता वारंवार ती चूक करत असेल तर अशा व्यक्तींवर कायद्याचा फास आवळणे गरजेचे असते.
बिटरगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गावातील विविध गुन्हे दाखल असलेल्या गुन्हे गारा वर कलम 56 महाराष्ट्र पोलीस कायद्या अंतर्गत कार्यवाही करून सदर आव्हाल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांना सादर करण्यात आला होता बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांनी वेळोवेळी गुन्हेगारावर करवाह्या केल्या होत्या त्यानंतर ही त्यांच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे कायदाला न जुमाणणाऱ्यावर तडीपारी करण्याचा अहवाल पाठवण्यात आला.14 गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव मान्य केला.
तडीपारी हा शब्द जरी कानावर पडला तरी सामान्य माणसाच्या मनात धस करते. तडीपार गुन्हेगाराला आपल्या पासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न समाज घटक करत असते.समाजात दहशत माजविणे वारंवार गुन्हे करणं सक्रिय गुन्हेगार घरफोडी चोरी लूटमार खून खुनाचा प्रयत्न, सध्या मोबाईल चे विश्व निर्माण झाले आहे त्यामुळे मोबाईल संगणकाचा वापर करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे,यासह इतर ही गुन्हे करणाऱ्या व्यक्तीवर मुंबई पोलीस कायद्या कलम 55, 56 आणी 57 नुसार कारवाही केल्या जातात.
बिटरगाव सारख्या ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन अंतर्गत एकाच वेळी 14 गुन्हेगारांवर तडीपारी सारख्या गुन्ह्या अंतर्गत कारवाही होणे परिसरातील नागरिकाला विचार करण्या सारखी गोष्ट आहे.
तडीपारी ची कारवाही बिटरगाव ही मा. डॉ.दिलीप पाटील भुजबळ,पोलीस अधीक्षक यवतमाळ मा. धरणे अप्पर पोलीस अधीक्षक यवतमळ, मा.पाडावी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, पोलीस स्टेशन ठाणेदार प्रताप भोस यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडावी यांच्या मार्गदर्शना खाली पोउपनि कपिल म्हस्के, ASI रवी आडे गोपनीय शाखेचे रवी गीते निगनूर बिट चे गजानन खरात, दत्ता कुसराम ढाणकी बिट जमादार मोहन चाटे निलेश भालेराव बिटरगाव बिट चे जमादार आतिष जारनडे नरेंद्र खामकर, सतीश चव्हाण क्राईम शाखेचे मोहसीन पठाण सपना गीते कोकिळा फाटेकर यांनी आव्हाल पाठविण्याची कार्यवाही पूर्ण केली.
0 टिप्पण्या