दादाजी नगर शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मुकुंद जामकर तर उपाध्यक्ष पदी सौ.सिमा देविदास कदम यांची निवड.


महागाव प्रतिनिधी 

महागाव तालुक्यातील हिवरा(संगम)येथील दादाजी नगर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी मुकुंद जामकर यांची तर उपाध्यक्ष पदी सौ.सिमा देविदास कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शासन निर्देशांचे पालन करून दादाजीनगर जिल्हा परिषद शाळेमध्ये पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीमध्ये शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येवुन पालकांनी अध्यक्षपदी मुकुंद जामकर यांची तर उपाध्यक्षपदी सौ.सिमा देविदास कदम यांची तर ग्राम पंचायत प्रतिनिधी म्हणुन ग्रा. प.सदस्या सौ जयश्री विजय कदम यांची निवड केली.

यावेळी बिहारी जयस्वाल,किरण काळे,अशोक मुडेवाड,सुदर्शन हिरेकर,समाधान शिंदे, पांडुरंग जाधव,ग्रा.प.सदस्य राजु धोतरकर यांच्यासह पालक उपस्थित होते .अशी माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष मुकुंद जामकर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या