पोफाळी पोलीस स्टेशनच्या नाकावर टिचून दुचाकी लंपास, अकरा दिवसानंतरही कोनताच थांगपत्ता नाही... दुचाकी सीसीटीव्हीच्या कॅमेर्‍यात कैद तरीही तपासाची दिशा सापडेना.

 


पोफाळी (प्रतिनिधी )

 पोफाळी पोलीस स्टेशन पासुन अवघ्या ४०० मिटर अंतरावरून  १७ तारखेच्या मध्यरात्रीला दुचाकी चोरीला गेली होती दरम्यान अकरा दिवसाचा कालावधी लोटूनही दुचाकीचा थांगपत्ता लागल्या नसल्यामुळे परिसरातुन संताप व्यक्त होत आहे, पोलीस प्रशासन केवळ तपास चालू आहे या गोंडस नावाखाली गाडी मालकाचे समाधान करण्याचा प्रयत्न सुरु आहे, तर दुसरीकडे या दुचाकी मालकाने या सदर्भात परिसतील तीन ठिकाणी सीसीटीव्हीचे चित्रिकरण शोधून ही दुचाकी एका मार्गाने गेल्याचे सांगितल्यानंतरही पोलीसांनी हे चित्रण पाहण्याची व त्या मार्गाने तपास करण्याची तसदी घेतली नाही.

पोफाळीच्या वसंतनगर परिसरातुन शुक्रवारी १७ तारखेच्या मध्यरात्री  चोरट्यांनी  अनिल सखाराम घुगरे यांच्या घरासमोरील अंगनात ठेवलेली हिरो होन्डा स्प्लेडर कंपनीची (क्र.MH 29 BL 0628) चोरट्यांनी लंपास केली सकाळी दुचाकी अंगनात दिसली नसल्यामुळे परिसरात शोधा शोध घेतला मात्र दुचाकीचा शोध लागला नाहीं त्यामुळे सायंकाळी ५ वाजता दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार पोफाळी पोलीस ठाण्यात देण्यात आली.

दुचाकी लपास होऊन आज आकरा दिवसाचा कालावधी लोटला आहे,मात्र पोलीस प्रशासन दुचाकी हरवल्याची माहिती संबधित सर्व पोलीस स्टेशनमध्ये दिली असून तपास सुरु असल्याच सांगुन फिर्यादीचे बोळवन करत आहेत. दरम्यान तक्रारकर्त्यानी या संदर्भात आपल्या परीने परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करत गाडीचा मागोवा घेतला यात ही दुचाकी दोन व्यक्ती एका दिशेने घेऊन जातांना दिसत आहेत , हि माहीती पोलीसांना दिली मात्र, पोलीसांनी या सीसीटीव्हीची तपासणी करण्याची तसदी  सुद्धा घेतली नाही. तर जिथून ही दुचाकी चोरीला गेली त्या परिसरातील काही भाग एका दुकानाच्या सीसीटीव्हीच्या कॅमेर्‍यात दिसतो त्यामुळे या कॅमेर्‍याचे चित्रण तपासने अत्यंत गरजेचे असंतांना याच चित्रिकरण तपासण्याची विनंती ठानेदारांना केली तेव्हा या सीसीटीव्हीच्या कॅमेर्‍यात काय येणार आाहे आणि काय मिळणार आहे, असं आश्चर्यकारक उत्तर पोलीस प्रशासनाकडून मिळाल त्यामुळे खरचं पोलीस प्रशासनाला या दुचाकीचा तपास करायचा आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.


पोलीस तपास सुरु आहे, आमचे १६ कर्मचारी बंदोबस्तात गेले त्यामुळे मनुष्यबळ कमी असूनही आमचा एक पोलीस कर्मचारी याचा तपास करीत आहे.

राजिव हाके, ठाणेदार, पोलीस स्टेशन पोफाळी.


मी स्वतः हर्षी, गौळ, पोफाळी येथील सीसीटीव्ही फुटेज बघून त्या बाबत ठाणेदाराला कळवले परंतु ठानेदारांनी त्या बाबीचा आधार घेऊन तांत्रिक बाबी तपासल्या असत्या तर गाडीचा शोध लागला असता परंतु गाडी चोरी बाबत योग्य सहकार्य करूनही तपास शून्य आहे.

अनिल घुगरे,फिर्यादी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या