कालव्यावर पूल करून देण्याची गांजे गाव शेत शिवारातील शेतकऱ्यांची मागणी.


 ढाणकी प्रतिनिधी -

 गांजेगाव शेतशिवारातील ऊर्ध्व पैनगंगा च्या कालव्यावर पुल करून देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता हदगाव यांना निवेदन सादर केले.

 गांजे गाव शिवारात या कालव्यामुळे शेतकऱ्यांना बराच फायदा झाला आहे मात्र या कालव्यावर पूल नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. शेतीची मशागत करणे, मालवाहतूक करणे यासाठी शेतकऱ्यांना आता अडीच किलोमीटरचा फेरफटका मारून जावे लागत असल्याने  याचा नाहक त्रास त्यांना होत आहे. सध्या या कालव्याचे नूतनीकरणाची काम चालू असून या कामात आरडी 82 येथे नवीन पुलाची निर्मिती करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

 विशेष म्हणजे या फुलासाठी मागील वीस वर्षापासून संघर्ष सुरू असून अद्यापही काम न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. योगायोगाने आता कालव्याची काम चालू असल्याने या पुलाची निर्मिती करून द्यावी यासाठी गांजेगाव शिवारातील शेतकरी प्रयत्न करत आहेत. याबाबत कार्यकारी अभियंता पैंगगंगा प्रकल्प हदगांव यांना निवेदन देण्यात आले.

 निवेदन देतेवेळी बिरबल केशेवाड, धोंडबाजी मस्के, संजय दिल्लेवार, मधुकर टेकाळे, नीलाबाई मस्के, उत्तम मस्के, उषा पुंडे, अनिल केशेवाड, पुंजाबाई वारकड, विमलबाई अलकटवार गोदावरी अलकटवार, बापूराव मिटकरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या