ढाणकी शहरात वन प्रयाग शेतकरी उत्पादन कंपनीचे थाटात उटघाटन. परिसरातील शेतकऱ्यांना होणार फायदा.

 


ढाणकी प्रतिनिधी

ढाणकी परिसरातील शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती मिळण्यासाठी व शेतकऱ्यांना शेती विषयक नियोजन कसे लावायचे व विविध मार्गदर्शन करण्याच्या हेतूने शेतकऱ्यांचा माल घेऊन त्यांना मोठ्या प्रमाणात मोबदला देण्याच्या उद्देशाने वन प्रयाग शेतकरी उत्पादक कंपनी ढाणकी शहरात शहरात स्थापना करण्यात आली असून त्याचा उटघाटन सोहळा नेमकाच पार पडला.

या कंपनीचे उद्घाटन उमरखेड तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा विकास प्रबंधक (नाबार्ड) दीपक पेदाम, प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी यवतमाळ कृषी विज्ञान केंद्र समन्वयक डॉ. सुरेंद्र नेमाडे, आत्मा प्रकल्प उपसंचालक शिवा जाधव, उमरखेड तालुका कृषी अधिकारी श्रीरंग निंबाळकर, तोंडापूर कृषी महाविद्यालय  प्राचार्य डॉ. विष्णू बोंढारे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले

कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळू पाटील चंद्रे,तंटामुक्ती अध्यक्ष रामराव गायकवाड, संजय कुंबरवार, रमेश गायकवाड, अभ्यासू शेतकरी देशमुख सर,माधवसिंग ठाकूर, मुन्ना आउटकर, एँरिस कंपनीचे अधिकारी नीलेश खिरे (बीएससी ऍग्री) , तलाठी शिवणकर, तलाठी डोंगरे व इतर प्रमुख व्यक्ती उपस्थित होते.

कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी बरेच प्रश्न केले व त्या प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले या कार्यक्रमासाठी वन प्रयाग शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित.चे संचालक कृष्णा देवरकर ,यादव वाळके ,गिरी येरावार, विवेक रावते ,विक्रम कलाने ,वासुदेव चिंन्नावार, प्रशांत दिल्लेवार, विनोद नाईक, विलास रावते व सूत्रसंचालन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऐश्वर्या लाखे यांनी केले तर आभार कंपनीचे संचालक तथा जय मल्हार ऍग्रो एजन्सी चे मालक नितेश लकडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या