मोहन कळमकर, ढाणकी
येत्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या ढाणकी येथील प्रभाग 12 आणि 13 च्या पोट निवडणूक मध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा दुहेरी सामना रंगणार असून ही निवडणूक आता प्रतिष्ठेचा विषय ठरत आहे.
राज्यात यशस्वी ठरत असलेल्या महाविकास आघाडी चा फार्मूला हा ढाणकी पोटनिवडणुकीत सुद्धा लावला गेला असून शिवसेनेच्या असलेल्या या जागेवर महा विकास आघाडीने शिवसेनेचे उमेदवार दिल्याने आता या निवडणुकीत भाजपा बाजी मारेन की महाविकास आघाडी ही येणारी वेळ ठरवेल.
दोन्ही प्रभागांमध्ये सध्या प्रचार जोरात सुरू असून घरोघरी जाऊन मतदान आपल्या पदरात पाडून घेण्याची धडपड सध्या उमेदवाराची दिसत आहे.
मतदारांच्या भेटी घेऊन आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याची विनंती सध्या स्थानिक नेते मंडळी करत असताना चे चित्र दिसत आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण ढवळून निघाले असून अतिशय प्रतिष्ठेच्या ठरत असलेल्या या पोटनिवडणुकीत प्रत्येक पक्षाला आपले संख्याबळ वाढवण्याची ही नामी संधी चालुन आली आहे. प्रभाग 12 आणि 13 च्या दोन्ही जागा जर भाजपाने जिंकल्या तर ढाणकी नगर पंचायत मध्ये भाजपाचे बहुमत होईल व बहुमताचा फायदा ढाणकी च्या विकासासाठी होईल असे काही नागरिकांचे म्हणणे आहे तर महाविकास आघाडी मुळे भाजपाच्या विजयामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो असे सुद्धा राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. दोन्ही जागा आपल्याच पदरी पडाव्या साठी अतिशय चुरशीची चा सामना रंगत असून दोन्ही जागा जिंकण्यासाठी कोणत्याही प्रकारची रिस्क महाविकासआघाडी तसेच भाजपा घेताना दिसत नाही आहे.
महा विकास आघाडी व तसेच भाजपा च्या या लढतीमध्ये अपक्ष उमेदवार सुद्धा महत्वाची भूमिका निभावत असून त्याचा फायदा आता कोणाला होतो हे पाहणे गरजेचे आहे. मागील निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांनी पक्षांच्या उमेदवारांचे मते खाल्ल्याने त्यांना पराजयाचे तोंड पाहावे लागले होते तसेच काही घटना आता या पोट निवडणुकीत होईल का याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या