.
उमरखेड प्रतिनिधी -मारोती गव्हाळे
उमरखेड तालुका अंतर्गत अति दुर्गम भागात वसलेले सोईट ( घ )हे गाव असून, हे गाव आदिवासी बहुल गाव आहे. या गावामध्ये प्रत्येक वर्षी जयंती साजरी होत असते. पण यावेळी भव्यदिव्य अस्या प्रकारची क्रांती सूर्य बिरसा मुंडा ची मिरवणूक काढून अत्यंत उत्साहात समाजप्रबोधनाचा कार्यक्रम फार मोठया जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पाडला, वेगवेगळ्या विचारवंतांनी महान क्रांतिकारकांच्या विचाराणा उजाळा देण्याचे काम केले.गाव लहान पण कीर्ती महान म्हटल्याप्रमाणे या छोट्याश्या आदिवासी बहुल गावातून, विविध क्षेत्रात, उच्चशिक्षीत शिक्षण घेत असून, जवळपास अंदाजे 55 ते 60 कर्मचारी विविध क्षेत्रात, विविध उच्चभ्रू पदावर कार्यरत आहेत. त्याच बरोबर इतरही विध्यार्थीचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेऊन तेथील सर्वच पदावर कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाचा व विध्यार्थी वर्गाचा समस्त गावाकऱ्यामार्फत क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्राम नागरी सत्कार सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमेश्वर बुरकूले पाटील होते.व प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत नायब तहसीलदार उत्तमरावजी पांडे उमरखेड,अमोल दुमारे पाटील आमडापुर .व्हि. जि.खराटे कोरटा ,बिरसा क्रांती दल जिल्हाउपाध्यक्ष यवतमाळ मारोती गव्हाळे,राजेश घुक्से, संजय बुरकूले
आयोजक म्हणून समस्त बिरसा मुंडा नागरी सत्कार समिती सोईट ( घ )व संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या