ढाणकी प्रतिनिधी
अत्यंत चुरशीच्या झालेल्या मेट येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माजी सैनिक तथा माजी जि प सदस्य उत्तमराव राठोड यांच्या सुन सौं प्रविणा विक्रम राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मेट येथील सरपंच पद हे अनुसूचित जाती साठी राखीव असल्याने पद रिक्त होते. गावात एकही अनुसूचित जातीचा उमेदवार नसल्याने दिनांक 25 नोव्हेंबर रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार आरक्षण हे इतर मागास वर्गात बदलण्यात आल्याने आणि मेट येथील सरपंच पदासाठी सौं प्रविणा राठोड यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली. यावेळी जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पडली. विशेष म्हणजे मेट ग्रामपंचायत वर तिसऱ्यांदा उत्तमराव राठोड यांच्या गटाचे वर्चस्व राहिले आहे.
या विशेष सभेला गजानन चव्हाण, सुभाष चव्हाण, गणेश चव्हाण, बालेकाबाई काळे, संगीता राठोड, सीमा जाधव, रती राठोड, शामराव जाधव, तलाठी पावडे साहेब, ग्रामसेवक प्रकाश राठोड, पोलीस रवी गिते, रवी आडे, गजानन खरात, तुळशीराम राठोड, प्रेम सिंग राठोड, प्रेम सिंग राठोड, उत्तम चव्हाण, प्रकाश चव्हाण, गोविंद राठोड,विक्रम राठोड, विजय चव्हाण,राहुल राठोड,मांगीलाल जाधव,संदीप राठोड, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या