टेम्भूरदरा येथे क्रांती सूर्य बिरसा मुंडा जयंती व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मुर्तीदिन केला साजरा. बिरसा क्रांती दल व युवा सेना टेभुरदरा च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे व लशिकरण कॅम्प चे केले आयोजन.

 


उमरखेड प्रतिनिधी-मारोतराव गव्हाळे 

उमरखेड तालुका अंतर्गत येत असलेले अति दुर्गम भागात वसलेले टेभुरदरा हे गाव असून,हे गाव आदिवासी व बंजारा बहुल गाव आहे. या गावामध्ये प्रत्येक वर्षी जयंती साजरी होत असते.त्याचप्रमाणे याहीवेळी सुद्धा  क्रांती सूर्य बिरसा मुंडा ची जयंती व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मुर्तीदिन अत्यंत उत्साहात पार पडला .बिरसा मुंडा, व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी आदिवासी च्या नृत्य कलेचा चा वारसा जपणारी दंडारण चे आयोजन केले व सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला.रक्तदान शिबिराचे आयोजन, (कोव्हीड -19 )चे लशीकरणाच्या कॅम्पचे आयोजन या महान विभूतीच्या पावन पर्वावर करण्यात आले. यामध्ये रक्तदान , लशीकरण, दंडारण नुर्त्यामध्ये फार मोठया प्रमाणात महिला व पुरुष मंडळी  सहभागी होते.एवढा भव्यदिव्य असा उपक्रम या बंदिभागात सर्वप्रथमच घेण्यात आल्याने गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी सरते शेवटी प्रबोधनाचा कार्यक्रम ही पार पाडला, वेगवेगळ्या विचारवंतांनी महान क्रांतिकारकांच्या विचाराणा उजाळा देण्याचे काम केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष चव्हाण होते, तर उदघाटक म्हणून बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रताप बोस होते तर,व प्रामुखअतिथी म्हणून शिवसेनेचे तालुका प्रमुख उमरखेड संभाजी गोरटकर, बिरसा क्रांती दल जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ मारोती गव्हाळे,सेवा निवृत प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके,दत्तराव ब्रम्हटेके, पोलीस पाटील परसराम ब्रम्हटेके, युवा सेना अध्यक्ष दिलीप जाधव, सक्रू महाराज, बिरसा क्रांती दल शाखा अध्यक्ष अमोल ब्रम्हटेके, प्रवीण मेडके, अविनाश मेंडके व आदी सर्वत्र ग्रामस्थ उपस्थित होते.आयोजक म्हणून बिरसा क्रांती दल टेभुरदरा,युवा सेना, शिवसेना, सेवालाल मंडळ, जयभिम मंडळ,फुलाजी बाबा मंडळ, कार्तिक मंडळ, वाल्मिकी मंडळ हे लाभले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या