जि.परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षानी नवीन चेहऱ्याला संधी द्यावी - मारोती गव्हाळे बि.क्रां.द.जि. उपाध्यक्ष


उमरखेड प्रतिनिधी 

सद्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपुष्टात आलेला असून, अवघ्या काही महिन्यावर जि. परिषद व पंचायत समिती ची निवडणूक येऊन ठेपली आहे.उमरखेड तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद गट असून, बारा पंचायत समिती गण आहेत. उमरखेड तालुक्याचा व्याप हा फार मोठा असून निधीही फार मोठया प्रमाणात येत असतो. त्याच अनुसंगाने येत्या निवडणुकीत प्रत्येक पक्षानी खरंच तो उमेदवार कर्तव्यदक्ष, होतकरू, प्रामाणिक असेल का?या गोष्टीचा विचार करून उमेदवारी प्रदान करावी.वंशपरंपरागत चालत आलो.म्हणून उमेदवारी देऊ नये. एकादा गरीबच का असेना, पण तो गोरगरीब समाजाचे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता निःस्वार्थपणे काम करत असेल तर,पक्षानी त्यांचा विचार करावा.जे जुने पदाधिकारी पद भोगून भोगून जर विकास काम भकास करत असेल तर!!त्यांना पक्षानी उमेदवारी देऊ नये. एकाद्या चांगल्या नवीन होतकरू व्यक्तींला, व खास करून ग्रामीण भागात वास्तव्य करीत असलेल्या  उच्चशिक्षित असलेल्या व्यक्तीला,नेतृत्व करण्याची आवड असलेल्यांना,राजकीय व सामाजिक प्रतिनिधित्व करण्याची संधी दयावी.कारण त्याला गावाविषयी, परिसराविषयीं गावविकास करण्याची जाणीव असली पाहिजे.असे वक्तव्य मारोती गव्हाळे, बिरसा क्रांती दल जिल्हा उपाध्यक्ष यांनी निंगनूर चिंचवाडी येथील आढावा बैठकीत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या