फुलसावंगी येथिल काकड आरतीच्या दिंडीची परंपरा 100 वर्षांपासून अजुन कायम.



महागाव प्रतिनिधी -संजय जाधव 

फुलसावंगी येथे कार्तिकी महिन्यात मागील 100 वर्षांपासून काकडा आरतीची परंपरा कायम आहे.हनुमान भजनी मंडळ च्या वतीने दरवर्षी प्रमाणे ह्यायी वर्षी फुलसावंगी येथील वार्ड क्रमांक 02 मधील हनुमान मंदिर येथून काकडा आरतीच्या दिंडीला सकाळी 05 वाजता सुरुवात होते व  गावातील सर्व घरातील तुळशीची दररोज नित्यनियमाने पूजा केली जाते. गावातील सर्व हनुमान मंदिर, दुर्गा देवी मंदिर,पुणेशवर मंदीर,खोलेशवर मंदिर ,राम मंदिर या ठिकाणी जाऊन दररोज आरती व गावांतील नागरिक दररोज दिंडीचे स्वागत करून आपल्या घरी बोलावून फराळ , चहा पाणी,देतात व कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी दिंडीची समाप्ती असते.त्यावेळी भजनी मंडळाच्या सर्व गावकऱ्यांना महाप्रसाद वाटला जातो.दिंडी मध्ये लहान बालक,तरुण मंडळी,वयोवृद्ध मंडळी सहभागी होत असतात.

जास्तीत जास्त तरुणांनी दिंडीत सहभागी व्हावे- कचरू खरात(हनुमान भजनी मंडळ,फुलसावंगी)

दरवर्षी आम्ही काकडा आरती दिंडी काढत असतो त्यामध्ये लहान बालके,तरुण मंडळी व वयोवृद्ध मंडळी हजर असतात परंतु जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होऊन ही परंपरा कायम ठेवावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या