ढाणकी प्रतिनीधी-
स्थानिक बुलढाणा अर्बन बॅंकेचा शिपाई दिगांबर माने याने शेतक-याचे हरवलेले चार हजार रूपये परत केल्याने प्रामाणिक पणाचा प्रत्यय आला.
हरी घोडगे यांनी 26 आॅक्टोंबर 2021 रोजी बॅंकेत गहान असलेले पत्नीचे मनी मंगळसुत्र ठेवुन गोल्डलोन चा व्यवहार पुर्ण केला. व गहाण ठेवलेले पत्नीचे मनी मंगळ सुत्र सेाडवले दरम्यान बॅंकेतुन बाहेर पडत असताना घाई गडबडीत त्यांच्या खिषातील चार हजार रूप्ये रक्कम बॅंकेच्या उंबरवठयाजवळ पडली. त्या बाबत शेतक-यांना व कुटूंबियांना किंतीतशि ही कल्पना नव्हती. दरम्यान च्या काळात शेतकरी व त्याची पत्नी व दोन दिवाळीची इतर खरेदी करण्यासाठी बाजारात गेले. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की, आपल्या जवळ असलेली शिल्लक चार हजार रूप्ये कुठेतरी पडले. याचा मागोवा घेत ते बॅंकेपर्यंत पोहचले. तेव्हा बॅंकेत कर्तव्यावर असलेल्या दिगांबर माने यांच्या लक्षात आले की, सदर शेतकरी भांबवलेल्या अवस्थेमध्ये असुन काही तरी त्यांच्याकडुन हरवले आहे. त्यांनी घोडगे कुटूंबियांची आस्थेने चैकशि केली असता पैसे हरवल्याचे त्यांनी सांगीतले.
रक्कम आणि नोटा यांची खात्री पटताच शिपाई दिगांबर माने यांनी धिर देत घाबरू नका तुमचे हरवलेले पैस मला सापडले आणि ते मी सुरक्षीत ठेवले आहे. सदर कुटूंबाना बॅंक व्यवस्थापक सचिन पांडे यांच्या कडे घेवुन गेले असता बॅंकेचे व्यवस्थापक सचीन पांडे , नंदकीषोर चौ धरी, संध्या घुगरे, कांचन ठाकुर, देविदास राठोड, आकाश वाघ यांच्या उपस्थितीत शाखा व्यवस्थापकांच्या हस्ते घोडगे कुटूंबियांच्या हातात हरवलेली रक्कम परत केली त्यामुळे एन दिवाळीच्या सनासुदीत ओढावलेले आर्थिक संकट शिपाई दिगांबर माने यांच्या प्रामाणिक पणोने दुर केले.
0 टिप्पण्या