सर्वसामान्य गोर गरीब जनतेचा, आपल्या हक्काचा माणूस विक्रम राठोड.


ढाणकी प्रतिनिधी -

                   मेट येथील उभारते नेतृत्व,  सामाजिक कार्यकर्ता,  व सामान्य जनतेचा हक्काचा माणूस म्हणून विक्रम राठोड yya यांच्या कडे बघितलं जाते. मेट येथे मागील 10 वर्षा पासुन पाणी पुरवठा वीज बिल भरण्यात आली नव्हती.त्यामुळे आपल्या ग्राम पंचायत चे पाणी पुरवठा वितरण वीज वितरण कंपनीने बिल मोठ्या प्रमाणावर थकीत असल्यामुळे आपली पाणी पुरवठा वीज कापण्यात आली होती.

आज रोजी आपली वीज कनेक्शन कट करून 10 ते 12 दिवस झाले परंतु अद्याप चालू करण्यात आली नव्हती.कारण आपले विक्रम  राठोड हे घरकुल च्या कामासाठी मुंबई येथे गेले होते.

     आज ते आल्या आल्या त्यांनी म्हणजे विक्रम भाऊ  व आपल्या ग्राम पंचायत मेट चे कर्तव्य दक्ष ग्रामसेवक श्री प्रकाश राठोड यांनी आज पूर्ण दिवस पंचायत समिती मध्ये स्वतः बसून योग्य नियोजन करून महावितरण कंपनीचे बिल भरण्यात आले.

 तसेच येवढ्या उशिरा काल रात्री 9 वाजता स्वतः विक्रम भाऊ पाणी पुरवठा सार्वजनिक विहिरीवर  जाऊन श्री योगेश ठाकरे साहेब अभियंता महावितरण विभाग ढानकी यांच्या विशेष मदतीने वीज कनेक्शन पुन्हा चालू करण्यात आली त्यामुळे आज पासून सर्वांना  पाणी सोडण्यात आले.यामधे सोबत गणेश चव्हाण,  विजय चव्हाण,विजय भाऊराव जाधव,दिनेश आडे,देवेन (पपू)राठोड व युराज राठोड हे उपस्थित होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या