दाऊ गाडगेवाड हिमायतनगर प्रतिनिधी
हिमायतनगर येथील पंतप्रधान घरकुल योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी घरकुल न मिळाल्याने प्रतीक्षेत आहेत, कारण हिमायतनगर नगरपंचायतीत गेल्या अडीच वर्षात ज्यांनी सत्ता भोगली त्यांच्या नाकर्तेपणामुळे घेण्यात आलेले अर्ज नगरपंचायत कार्यालयात धूळखात पडून आहेत. हि बाब लक्षात आल्यानंतर प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद आणि आमच्या सहकाऱ्यांनी हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर साहेबांच्या निदर्शनास आणून दिले. आणि तात्काळ कुशाग्र असोशिएशन एजन्सीला मुदत वाढ मिळावी व नवीन लाभार्थ्यांचे अर्ज घेऊन त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून निवेदन देऊन निदर्शनास आणून दिले आहे. यावेळी माजी कृउबा संचालक रफिक सेठ, माजी नाजीमचे संचालक गणेश शिंदे, फेरोजखान पठाण, संजय माने, अश्रफ खान, सरदार खान, हनीफ सर, मनानं भाई, सादिक चाथारकर, आहद भाई, रियाज कंबलवाले, आदींसह अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनाची दखल घेऊन तात्काळ आ.माधवराव पाटील जवळगावकर साहेबांनी प्रशासक आणि प्रभारी मुख्याधिकारी याना दूरध्वनीवरून तात्काळ सूचना देऊन कुशाग्र एजन्सीला मुदतवाढ देऊन नवीन घरकुलासाठी लाभार्थ्यांचे अर्ज घेण्यासाठी ८ ते १० दिवसाची मुदत द्यावी. आणि शहरातील दुसऱ्या टप्प्यातील वंचित लाभार्थ्यांच्या घरकुलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सविस्तर संपूर्ण डीपीआर तयार करून तात्काळ मंजुरीसाठी पाठवावे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांच्या रखडलेला आणि धूळखात पडलेल्या प्रस्तावाला चालना मिळणार असून, लवकरच संबंधित एजन्सी या कामाला सुरुवात करून त्या प्रस्तावाला मंजुरी देईल अशी अपेक्षा लाभार्थी व नागरिकांना आहे.
0 टिप्पण्या