पोलीस स्टेशन बिटरगाव येथे जातीय सलोखा कार्यक्रम मध्ये 51 रक्त दात्याने रक्तदान केले.

 

ढाणकी प्रतिनिधी 

पोलीस स्टेशन बिटरगाव व  बिटरगाव मधील सर्व दुर्गा मंडळ पदाधिकारी व समस्त बिटरगावकर यांचे संयुक्त विद्यमानाने गावामध्ये जातीय सलोखा कायम राहावा म्हणून नवदुर्गा उत्सव  चे औचित्य साधून  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरास डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय नांदेड  टीम आली होती  सदर रक्तदान शिबिरास पोलीस बांधव व बिटरगाव, भोजनगर, रतन नाईक नगर,  येथील तरुण मंडळीनी रक्तदान केले. रक्तदान करण्यासाठी मोठया प्रमाणत महिलांनी सहभाग नोंदविला. सदर शिबीरास ऐकून 51 रक्तदात्यानी रक्तदान केले. सदर शिबिरास ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस, पोउपनि कपिल मस्के   पोहवा रवी आडे, पोना रवी गिते,अतिश जारंडे  पोका नरेंद्र खामकर व पोलीस कर्मचारी होमगार्ड सरपंच प्रकाश पेदे, तंटा मुक्ती अध्यक्ष काशिनाथ पेदे, सचिन साखरे, पोलीस पाटील नामदेव देवकते, माजी पोलीस पाटील कांबळे,   बंडू देवकते, सुजित तूपेकर, बाळू हामद, अमित संदेश कांबळे, वसंता नरवाडे, विलास फुलारी, पिंटू देवकते, देवा देवकते, मस्तानभाई, गोस शेख, सतीश चिकणे, गजानन मिचेवार  विजय विनकरे, लक्ष्मण हाके, विनोद नाईक, संतोष गवळी, मुसा भाई, मस्तान भाई,   व पत्रकार बांधव यांनी रक्तदान शिबीर पार पाडण्याकरिता मोलाचे सहकार्य केले.सदर रक्तदान हे सोशल डिस्टन्स पाळून पार पाडण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या