गिट्स कंपनीच्या गुलाब जामुनच्या पॉकेटात आढळल्या अळ्या व किडे. विक्रेता व कंपनीवर त्वरित कारवाई करा. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे भागवत देवसरकर यांची मागणी.



दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी 

सारखणी ता. किनवट जि. नांदेड येथील साईबाबा किराणा दुकानामधून गिट्स कंपनीच्या गुलाबजामुन पाकिटाची खरेदी वायफनी येथील शेतकरी अरविंद पाटील कदम यांनी खरेदी केली होती, खरेदी केल्यानंतर पाकिट उघडल्यानंतर किडे, अळ्या आढळून आल्या व अत्यंत निकृष्ट दर्जाचं पीठ त्या पाकिटात होतं. याबाबत दुकानदाराकडे विचारणा केली असता दुकानदाराने ते पाकीट काय माझ्या घरी तयार होत नसून कंपनीतून असे उत्तर दिले. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीला माहिती दिली असता त्या पाकीटच्या बदल्यात दुसरं पाकीट देतो, असे ग्राहक अरविंद कदम यांना सांगितले. ग्राहकांच्या जीवाशी खेळणार्‍या विक्रेता व गिट्स कंपनीवर त्वरित कारवाई, अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य भागवत देवसरकर यांनी नांदेड येथील सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन श्री सरकटे यांच्याकडे केली आहे.

गिट्स कंपनीच्या गुलाब जामुनच्या पाकिटातील पिठाचा नमुना तपासणीसाठी लॅबमध्ये त्वरित पाठवावा अहवाल आल्यानंतर याची सत्यता कळेल. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने बाजारात अशा पाकिटांची विक्री होत असेल तर ती त्वरित थांबवावी याबाबत प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे अन्यथा याची तक्रार राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे करणार असल्याचेही भागवत देवसरकर यांनी सांगितले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या