बिटरगाव येथे सुरु होत आहे "वाचन चळवळ" सार्वजनिक वाचनालय साठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पूढे येण्याची गरज.



ढाणकी प्रतिनिधी -

तालुक्यातील बिटरगाव बु येथे गावकऱ्यांच्या वतीने वाचन चळवळ उभी राहत असून लवकरच तेथे सार्वजनिक वाचनालय उभे राहणार आहे. 

"वाचाल तर वाचाल" असे म्हटले जाते.  मवाचन हे माणसाला समृद्ध बनवते.  विचार प्रलब्ध करते आणि माणूस म्हणून कस जगायचं  हे वाचन च शिकवते.  पुस्तका सारखा दुसरा मित्र नाही असं उगीच म्हटलं जात नाही.  पुस्तकाच्या माध्यमातूनच माणूस गुंत्यातून सुटू शकतो.  असे अनेक विध कारण आहेत ज्या मुळे माणसाने दिवसाला काही तर वाचले पाहिजे.  

या सर्व ध्यानात घेऊन बिटरगाव येथील तरुण मंडळी एकत्र आली आणि त्यांना साथ ही जेष्ठाची ही मिळाली आणि एक सार्वजनिक वाचनालय उभ करण्याच्या संकल्पनेन जन्म घेतला. ज्ञानाचा महामेरू,  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर असे या सार्वजनिक वाचनालयाचे नाव असून शांतिदूत बौद्ध विहारा मार्फत हे संचलित केले जाणार आहे.  प्रशस्त अश्या या जागेत हे वाचनालय उभे राहणार असून याचा फायदा गावातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विधार्थी वर्गाला नक्कीच होईल.  हे उभे राहत असलेले वाचनालयात सर्व पुस्तके राहणार असून या करिता लोकसहभागाच्या माध्यमातून वर्गणी गोळा करणे सुरु आहे.  गावातील व परिसरातील दानशूर या साठी मदत करत आहेतच मात्र ज्यांचे काही गावाशी नाते नाही ते सुद्धा या वाचनालया च्या उभारणी साठी हातभार देत आहेत. 

या कार्यासाठी आर्थिक मदतीची गरज असून ज्या कुणा व्यक्तीला या कार्यात सहभाग घ्यायचा आहे त्यांनी शांतीदूत बौद्ध विहाराचे अध्यक्ष संदेश कांबळे मो (फोन पे) 9552826025 यांच्याशी संपर्क साधण्या चे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या