महागाव प्रतिनिधी -संजय जाधव
उमरखेड उपविभागीय कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी पुसद डॉक्टर प्रशांत नाईक व तालुका कृषी अधिकारी उमरखेड लिंबाळकर यांच्या मार्गदर्शना खाली ईसापुर येथे अन्नसुरक्षा अभियानांतर्गत २०२१ शेतकर्यांची कार्यशाळा मंगळवार दिनांक 10 ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आली. या कार्यशाळे मध्ये ढाणकी खंड दोनचे मंडळ कृषी अधिकारी एस .एस. देशपांडे यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत गळित धान्य विकास कार्यक्रम बद्दल माहिती दिली सोयाबीन पिकावरील किड व्यवस्थापन कापूस पिकावरील कीड व्यवस्थापन याबद्दल योग्य मार्गदर्शन केले कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी याबद्दल सहाय्यक कृषी अधिकारी डी .बी .घुगरे यांनी मार्गदर्शन केले जे. यम. कदम कृषी सहाय्यक यांनी उंट अळी घाटे बोंड अळी अळी चक्रीभुंगा याबद्दल मार्गदर्शन केले सुक्ष्म सिंचन योजना, रिसोर्स बैंक तयार करणे तसेच पीक विमा विषयी माहिती व या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. मडंळ अधीकारी एस. एस. देशपांडे यानी सोयाबीन व कापूस पिकावरील किड नियंत्रण करण्याकरिता १ टक्के निंबोळीअ र्काची फवारणी करून पर्यावरण संतुलन राहीले पाहीजे याविषयी मार्गदर्शन केले. संदेश मोरे ग्रामपंचायत सदस्य यांनी गटशेती, कृषी यांत्रिकीकरण, खंताचा संतुलीत वापर करणे याबाबत मार्गदर्शन केले व तसेच संजय जाधव जास्त कृषी योजनाचा लाभ घ्यावा तसेच पीक विमा विषयी प्रत्येक गावामध्ये पाऊस मोजणी यंत्र बसवावे याबाबत पाठपुरवाक रण्याची मागणी केली. शेतपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा मिळाला पाहीजे याहष्टीने प्रयत्न झाले पाहीजे असे सांगितले. कृषी सहाय्यक कदम यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक यांत्रिक पद्धत वापरून कमी क्षेत्रावर जास्त उत्पन्न काढण्यासाठी प्रयत्न केले पाहीजे, रोजगार हमी फळबाग लागवड, नाडेप कंपोस्ट खत या योजना राबविल्या पाहिजे असे सांगितले. सदर कार्यशाळेस इसापूर येथील पोलीस पाटील संध्या मारकवार आदर्श शेतकरी योगेश मारकवार प्रेम सिंग राठोड रतन जाधव राजू मारकवार अनिल चव्हाण व शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते सदर कार्यशाळेचे आयोजन जेएम कदम कृषी सहाय्यक यांनी केले होते.

0 टिप्पण्या