प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे ठाणेदार बिटरगांव यांना निवेदनाव्दारे मागणी.
ढाणकी प्रतिनीधी-
यवतमाळ येथील रेशन माफीया शेख रहीम शेख करीम गरीबांच्या धान्याची बाजारात विक्री केल्या प्रकरणी तसेच लोकमत चे उपसंपादक सुरेंद्र राउत यांच्या जिवे मारण्याची धमकी दिल्या बाबत आरोपीवर कठोरातल्या कठोर कारवाई करून करावी अषी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने पोलीस अधिक्षक यवताळ यांना निवेदनाव्दारे केली आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन माध्यम निपक्ष व निर्भीड भुमिका मांडतात. त्यांच्या कार्याने व कर्तव्याने समाजातील अवैध व्यवसायीक , गावगुंड चवताळुन उठतात. यवतमाळ तालुक्यात शहरात गरीबाचे राशन काळया बाजारात कश्या प्रकारचे विकले जाते याचे सत्य लोकमत चे उपसंपादक सुरेंद्र राउत यांनी पध्दतषिरपणे वृत्त प्रकाशीत केले होते. वृत्तातील मजकुर व सत्यता लिखानामुळे राशन माफियाचे पितळ उघडे पडले. त्यामुळे आरोपी शेख रहीम हा जाम भडकला. एवढेच नव्हे तर त्याची मजल भ्रमणध्वनी वरून सुरेंद्र राउत यांना जिवे मारण्याच्या धमकी पर्यंत पोहचली ही लोकशाहीच्या स्तंभाची मुस्कटदाबी आहे. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटनारा मस्तावलेल्या गावगुंडाना कायदयाच्या बेडया ठोकुन शेख रहीम वर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड तालुका अध्यक्ष मारोती गव्हाळे, उदय पुंडे,मोहन कळमकर, विनोद गायकवाड, मैनोदीन सोदागर, गोपाल गौरवाड, विकास चापके, वसंता नरवाडे, गजानन गंजेवाड, मनोज राहुलवाड, गजानन नावडे, इत्यादीनी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

0 टिप्पण्या