ढाणकी स्टेट बँक शाखेत ग्राहकांसाठी,शौचालय,मुतारी, पिण्याचे पाणी यासह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करा. -LOKमानस


वंचित बहुजन आघाडीचे शाखा व्यवस्थापक अजय कुमार वानखेडे यांना निवेदन


    ढाणकी प्रतिनिधी

            ढाणकी स्टेट बँक शाखेत ग्राहकास सोय सुविधा मिळत नसल्यामुळे ग्राहकांची प्रचंड हेळसांड होत होत आहे .ढाणकी परिसरातील ६५००० ग्राहक आपल्या बँकेशी जोडले आहेत.तसेच ग्राहक सेवा केंद्रा मार्फत( सी,एस पी)लाखो ग्राहक जोडलेले आहेत .परंतु या ग्राहकांना सोईसुविधा नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे ,बँकेत येणाऱ्या ग्राहकांसाठी शौचालय् व मुतारीची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणी दिव्यांग ग्राहक्कांसाठी रम्प ची व्यवस्था ,जेष्ठ नागरिक पेन्शनधारकांसाठी बसण्याची व्यवस्था महिलांची व पुरुष्यांची कॅश काउंटर वर वेगवेगळी रांगेची व्यवस्था करणे गरजेचे असतांना सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे तसेच ए. टी. एम. मशीन बाहेर बसवीने गरजेचे आहे त्यामुळे बँकेत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण बसू शकते ,

   ढाणकी स्टेट बँकेत चांगल्या सोईसुविधा पुरविण्यासाठी रिक्त कर्मचाऱ्यांचा भरणा करून ग्राहकांची होणारी हेळसांड दूर करण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.शाखेत कॅश काउंटर पैसे भरण्याचे व काढण्याचे वेगवेगळे करण्याची आवश्यकता आहे,तरी ग्राहकांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी तातडीने पाऊले उचलून वरील मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात् अशी मागणी ढाणकी येथील वंचित बहुजन आघाडीचे वतीने  स्टेट बँक ढाणकी  शाखेचे व्यवस्थापक अजय कुमार वानखेडे यांना निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टी उर्फ प्रशांत विणकरे, नगरसेवक संबोधी गायकवाड,तालुका संघटक समाधान राऊत,रुपेश गायकवाड़ विवेक कानिंदे सिद्धार्थ गायकवाड,सुनील भगत,किरण गायकवाड,बाळू गायकवाड,आकाश बोरकर,पप्पू गायकवाड, सूरज गायकवाड आप्पजी गायकवाड, सतीश मनोहर गायकवाड,अजय कदम,अभिमन्यू वाठोरे,धम्मपालं गायकवाड,विष्णुकांत वाडेकर,वृदभूषण पाईकराव,अंकुश धुळे,अफरोज भाई यांनी केली आहे,.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या